अणसुर येथे २८ पासून भव्य संगीत महोत्सव

कीर्तन, फुगडी स्पर्धा आणि वारकरी भजन स्पर्धेचा समावेश
Edited by: दीपेश परब
Published on: October 26, 2022 15:13 PM
views 338  views

वेंगुर्ला : श्री देवी सातेरी कला- क्रीडा मंडळ, अणसुर यांच्यावतीने दि. २८, २९ व ३० रोजी येथील श्री देवी सातेरी मंदिर अणसूर येथे भव्य संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. २८ रोजी सायंकाळी ४ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ होणार असून यानंतर सायं. ६ पासून ह.भ.प. श्री शरद बुवा घाग, नृसिंहवाडी- कोल्हापूर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. तसेच दि. २९ ऑक्टोबर रोजी सायं ६ पासून भव्य नामांकित महिला फुगडी गटांची फुगडी स्पर्धा तर दि. ३० ऑक्टोबर रोजी सायं. ६ पासून नामांकित वारकरी भजन मंडळांची वारकरी भजन स्पर्धा होणार आहे. तरी सर्व भाविक व रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन अणसुरकर, कार्याध्यक्ष रंगनाथ उर्फ नाथा गावडे व श्री देवी सातेरी कला- क्रीडा मंडळ अणसुर यांनी केले आहे.