दोडामार्गात रविवारी भव्य मॅरेथॉन स्पर्धा

मंत्री दीपक केसरकर - माजी खासदार सुधीर सावंत यांची प्रमुख उपस्थिती
Edited by: संदीप देसाई
Published on: September 02, 2023 16:19 PM
views 190  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुका शिवसेनेच्या वतीने  रविवारी ३ सप्टेंबरला भव्य वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.   रविवारी ठीक ९ वाजता दोडामार्ग प्रा. शाळा नंबर 1 येथून या स्पर्धेला सुरावत होणार आहे. या भव्य स्पर्धेचे उदघाट्न शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. 

स्पर्धेत दोडामार्ग तालुक्यातील  युवा युवती, लहान मुले - मुली,  प्रोढ व्यक्ती या साऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन दोडामार्ग talika शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी केले. स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. दोडामार्ग तालुक्यात प्रथमच अशी भव्य मॅरेथॉन स्पर्धा होत असल्याने तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते विशेष मेहनत घेत आहेत.