व्हाईस ऑफ मीडिया तर्फे १८ मार्चला भव्य महाआरोग्य शिबीर

Edited by: विनायक गावस
Published on: March 14, 2024 13:03 PM
views 137  views

सावंतवाडी : जिल्हातील सर्व पत्रकार आणि कुटुंबीयांसाठी व्हाईस ऑफ मिडिया आयोजित जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने व उद्योजक विशाल परब प्रायोजित महाआरोग्य शिबिर १८ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आले आहे. सर्व पत्रकार व कुटुंबियांसाठी, गरजू रुग्णांसाठी तसेच कोविड काळात ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर झालेला परिणाम विचारात घेऊन विद्यार्थ्यांची विशेष नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित सर्व पत्रकारांना आयुष्यमान भारत कार्ड वाटप करण्यात येणार आहे. तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी केली जाणार आहे अशी माहिती  व्हाईस ऑफ मीडिया जिल्हाध्यक्ष  परेश राऊत यांनी दिली.

सर्व पत्रकार आणि सिंधुदुर्ग वासियांनी मोठ्या संख्येने या महाआरोग्य शिबिराला उपस्थित राहावे असे आवाहन व्हाईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग यांच्यावतीने करण्यात आले आहे. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष परेश राऊत, कार्याध्यक्ष समीर महाडेश्वर,उपाध्यक्ष विष्णू धावडे,मिलींद धुरी, भुषण सावंत, सचिव विष्णू चव्हाण, सहसचिव संजय पिळणकर, खजिनदार शैलेश मयेकर, सहखजिनदार नयनेश गावडे, संघटक आनंद कांडरकर, बी. एन. खरात आदी उपस्थित होते.