
सावंतवाडी : ओवळीये येथील युवा उद्योजक आशिष गुंडू सावंत यांनी सावंतवाडी शहरात मेडिकल दुकान सुरु करून गेली अनेक वर्षे ग्राहकांना सेवा दिली. प्रामाणिकपणे हा व्यवसाय करताना वेलकेअर फार्मसी या आपल्या दुसऱ्या मेडिकल दुकानाचा शुभारंभही केला आहे. या मेडिकलचा शुभारंभ आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी सर्वेश तेली, प्रथमेश तेली, आशिष सावंत, कविता सावंत, युगंधरा सावंत, गुंडू सावंत, महादेव देसाई, भाजपचे युवा कार्यकर्ते सागर सावंत, मनोज सावंत, यांच्यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.