वेंगुर्लेत भव्य मोफत बहुद्देशीय वैद्यकीय शिबीर

श्री मठ संस्थान दाभोली, कुडाळदेशस्थ आद्य गौड ब्राम्हण युवक मंडळ, पूर्णांनंद सेवा समितीचे आयोजन
Edited by: दिपेश परब
Published on: May 17, 2025 13:34 PM
views 98  views

वेंगुर्ला : श्री मठ संस्थान दाभोली, कुडाळदेशस्थ आद्य गौड ब्राम्हण युवक मंडळ, पूर्णांनंद सेवा समितीचे यांच्यावतीने तसेच सामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकर, उमेश गाळवणकर आणि उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ले, वालावलकर रुग्णालय डेरवण यांच्या सहकार्याने वेंगुर्ले येथे भव्य मोफत बहुद्देशिय वैद्यकीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. 

   रविवार दिनांक २५ मे २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळात वेंगुर्ले शहरातील उपजिल्हा रुग्णालय येथे हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते व फोंडा गोवा येथील उद्योजक वि.तू. प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तसेच या शिबिराला विषेश अतिथी म्ह्णून माजी शिक्षणमंत्री तथा आमदार दिपक केसरकर, आमदार किरण सामंत, उद्योजक रवींद्र उर्फ अण्णा सामंत, जिजामाता पूरस्कार विजेत्या स्वरूपा रवींद्र सामंत आदी उपस्थित राहणार आहेत. 

    या शिबिरामध्ये नेत्रविकार तपासणी, स्त्रीरोग तपासणी व मार्गदर्शन, बालरोग तपासणी व मार्गदर्शन, कर्करोग तपासणी, नाक- कान-घसा तपासणी, ऍक्युप्रेशर तज्ज्ञांनद्वारे उपचार व मार्गदर्शन, त्वचारोग तपासणी, चेस्ट फिजिशियन, फिजिओथेरपी (डायथर्मी) उपचार, हृदयविकार तपासणी, दंत चिकित्सा, रक्त तपासणी, पी.एफ.टी., नेत्रचिकित्सा, मोफत चष्मे वाटप, अस्थीरोग चिकित्सा आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत.  

  या शिबिरात मुंबई व डेरवण येथील तज्ञ डॉक्टर्स द्वारे रुग्ण तपासणी करण्यात येणार असून यात जनरल सर्जन डॉ. अंकिता हुले, जनरल मेडिसिन डॉ. राज देसाई, ऑप्थल डॉ. रिया साळुंके, गायनॉकॉलॉजिस्ट डॉ. निहारिका राहुल, ऑप्थोपेडिक डॉ. अपूर्वा दुबे, इएनटी डॉ प्रतीक शहाणे यांचा समावेश आहे. तरी या शिबिराचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सचिन वालावलकर व आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.