विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत रानभाज्यांचे भव्य प्रदर्शन

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: July 26, 2025 16:20 PM
views 102  views

कणकवली : विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत निसर्गातील दुर्मिळ अशा रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री असा भव्य उपक्रम साजरा करण्यात आला. या प्रदर्शनाचे उद्‌गाटन शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विजयकुमार वळंजू व विश्वस्त अनिलपंत डेगवेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक पी जे कांबळे यांनी निसर्ग निर्मित रानभाज्या व मानवी आरोग्य या विषयी मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक अच्यूतराव वणवे यांनी रान भाज्यांची ओळख करून दिली. विज्ञान शिक्षिका  शर्मिला केळूसकर यांनी रान भाज्यांचे शास्त्रीय महत्व या विषयी मार्गदर्शन केले. प्रशालेतील सर्व विद्यार्थांसाठी प्रदर्शन खुले ठेवण्यात आले. यावेळी प्रशालेतील जेष्ट शिक्षक जनार्दन शेळके, प्रसाद राणे, सौ सावंत, अमोल शेळके, दिप कदम उपस्थित होते. प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.