शनिवारी 25 नोव्हेंबरला रंगणार दोडामार्ग शहरात भव्य दीपावली शो टाईम

वक्रतृंड कला क्रीडा मंडळाचे आयोजन
Edited by:
Published on: November 24, 2023 17:28 PM
views 175  views

दोडामार्ग : दोडामार्ग शहर व तालुक्याच्या सांस्कृतिक चळवळीस अधिक बळ देणाऱ्या दोडामार्ग येथील वक्रतृंड कला क्रीडा मंडळाचा यावर्षीचा दीपावली शो टाईम उद्या शनिवारी २५ नोव्हेंबर ला मोठ्या दणक्यात येथील शहर बाजारपेठेत आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने खास दोडामार्ग आयडॉल व खुल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धकांना स्पर्धा सुरू होण्याच्या दिवसांपर्यंत म्हणजेच २५ नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजेपर्यंत नावनोंदणी करता येणार आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील स्पर्धकासह महाराष्ट्र व गोवा येथील स्पर्धकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे व तालुक्यातील प्रेक्षकांनी या शो टाईम चा मनसोक्त आनंद घ्यावा असे आवाहन वक्रतृंड कला क्रीडा मंडळातर्फे अध्यक्ष मनोज पार्सेकर यांनी केलं आहे.

दोडामार्ग बाजारपेठ वक्रतृंड कला क्रीडा मंडळ गेल्या काही वर्षांपासून दोडामार्ग शहरातील सांस्कृतिक चळवळीला व्यापक स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी दीपावली शो टाईम चे हटके आयोजन करत आहे. वर्षानुवर्षे दोडामार्ग शहारातील हा उत्सव शहरवासीय आणि तालुकावासियानी यादगार ठरतो आहे. गेल्या वर्षीपासून तर हा कार्यक्रम थेट बड्या शहरांप्रमाणे थेट बाजारपेठ मध्ये खुल्या रंगमंचावर आयोजित करण्यात येत आहे. यासाठी उद्योजक विवेकानंद नाईक,  उद्योजक तथा भाजपचे युवा नेते विशाल परब आणि मंडळाचे हक्काचे माणूस तथा दोडामार्ग शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच मोठ सहकार्य मिळत आहे. अध्यक्ष मनोज पार्सेकर, सहकारी विशाल चव्हाण, प्रकाश सावंत, विशाल मणेरीकर, राजेश फुलारी, यांसह मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकदिलाने हा शो टाईम यादगार बनण्यासाठी विशेष मेहनत घेत असते. यावर्षी सुद्धा तितक्याच दिमाखात दीपावली शो टाईम संपन होणार आहे.


संज्योती जगदाळे व गणेश मेस्त्री यांची खास उपस्थिती...

दोडामार्ग आयडॉलसाठी मनोज पार्सेकर पुरस्कृत सुर नवा ध्यास नवा फेम संज्योती जगदाळे व सोनी टीव्ही इंडियन आयडॉल, झी मराठी सारेगमप फेम गायक कोकण कुमार गणेश मेस्त्री यांची उपस्थिती असणार आहे.



दोडामार्ग आयडॉलसाठी रोख व आकर्षक बक्षिसे

वक्रतुंड कला, क्रिडा मित्रमंडळ बाजारपेठ, दोडामार्ग आयोजित या स्पर्धेसाठी नगराध्यक्ष चेतन चव्हाण पुरस्कृत प्रथम पारितोषिक 10,000/-, द्वितीय 7,000/- , तृतीय 5,000/- व तिन्ही विजेत्यांना आकर्षक चषक तसेच स्थानिक उत्तेजनार्थ  2,000/- आकर्षक चषक व अन्य 3 स्पर्धकांना उत्तेजनार्थ 1000/- बक्षीस देण्यात येणार आहे.

फॅन्सी ड्रेस स्पर्धाही ठरणार आकर्षण

दीपावली शो टाईम निमित्ताने फॅन्सी ड्रेस स्पर्धाही आयोजित करण्यात आली असून त्यासाठी प्रथम 3000/- , द्वितीय 2000/-, तृतीय  1000/- , चतुर्थ पारितोषिक 750/-, स्थानिक स्पर्धक 1000/-, उत्तेजनार्थ 500/- ची 3 बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

या दोन्ही स्पर्धेत सहभाग नोंदणी व अधिक माहितीसाठी मनोज पार्सेकर 9049980770, विशाल चव्हाण 8600065620 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.