कोनाळ ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामविकास आघाडीच बाजी मारणार !

यावेळी सरपंचपदी माया लोंढेच | सरपंच पराशर सावंत यांना विश्वास
Edited by: संदीप देसाई
Published on: December 17, 2022 07:40 AM
views 175  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात उसप पिकुळे प्रमाणेच सर्वांचे लक्ष लागलेल्या कोनाळ ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामविकास आघाडीच्या माया दयानंद लोंढे यांच्या झंझावाती प्रचाराने आपल्या विजयाकडे वाटचाल केली आहे. गेल्या १० वर्षापासून बचतगट अध्यक्ष व त्यानंतर ग्रामसंघ अध्यक्ष म्हणून सरपंच पराशर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी केलेलं काम आणि सरपंच पदाच्या कामकाजाचा जवळून केलेला अभ्यास त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला असून याच जोरावर आपला व आपल्या पॅनलमधील सहकारी सदस्यांचा विजय पक्का असल्याचा दावा केला आहे. महिला सरपंच म्हणून मी ज्या पदासाठी आज निवडणूक लढवीत आहे, त्या पदाचा ग्रामपंचायतमध्ये गेल्या १० वर्षात सातत्याने होणारे उपक्रम, अभिनयाने यात सहभाग असल्याने माझ्या प्रदीर्घ अनुभवाचा गावच्या खऱ्या  विकासासाठी उपयोग होईल, याचा मतदार विचार करणार असल्याने आपली बाजू भक्कम असल्याची माया लोंढे यांना पक्की खात्री आहे. 

त्यांच्याच पॅनलचे सहकारी आणि विद्यमान सरपंच पराशर सावंत यांच्यासोबत गेली पाच वर्षात गावासाठी त्यांनी केलेली विकासकामे ही सुद्धा आमच्यासाठी जमेची बाब असून आम्ही केलेल्या कामांची पोच पावती आम्हाला मिळणार आहे. येत्या काळात सुद्धा सहकारी म्हणून श्री. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पाच वर्षात झालेल्या विकास कामाना व स्वच्छ कारभाराला पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने आपला प्रयत्न राहील असे सौ. लोंढे यांनी स्पष्ट केले आहे.

पराशर सावंत सरपंच असताना गेल्या पाच वर्षात कोनाळ गावात अनेक विकासात्मक कामे झाली आहेत. कोरोना सारखा कठीण काळ, तिलारी नदिच्या पुरस्थितीत चांगल्या प्रकारे सरपंच पराशर सावंत यांनी काम केल. तसेच कोरोना काळात लसीकरण मोहिम राबविण्यात आली होती. महिलांसाठी अभ्यास दौरे, शाळांचे  डिजिटलीकरण, अंगणवाडीसाठी विविध साहित्य, क्रीडा साहित्य वाटप, ख्रिश्चन बांधवाची दफनभूमी शेड बांधकाम, स्ट्रीट लाईट, गवसवाडी नळ योजना काम,  मिनी कॉलनी राजू निंबाळकर घर ते बस स्टॉप स्ट्रीट लाईट, ठाकूरवाडी रस्ता, वरची ठाकुरवाडी रस्ता, महिलांसाठी प्रशिक्षण, भगीरथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून कुकर वाटप, मुलीना मोफत सायकल वाटप, फळझाड वाटप,  विविध स्पर्धा अशा अनेक उपक्रम सरपंच असताना राबविण्यात आले , तसेच भविष्यात ग्राम विकास आघाडी पॅनलच्या माध्यमातून अनेक विकासकामे पूर्ण करण्याचा मानस आहे. तसेच तिलारी धरण परिसरात पर्यटन प्रकल्प येण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून पाठपुरावा करून स्थानिकांना रोजगार निर्मिती करण्यावर प्राधान्याने व जास्त भर देणे. तसेच भविष्यात गावात प्रत्येक वाडीला स्वतंत्र नळ योजना  सर्वांच्या सहकार्यातून पूर्ण करणे. अशा प्रकारे गेल्या पाच वर्षात सरपंच म्हणून यशस्वी  काम केलेल्या पराशर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व सदस्यांच्या मदतीने गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा सौ. लोंढे यांचा विकास अजेंठा असल्याने महिला, गावकरी मतदार आमच्याच पॅनलला पहिली पसंती देतील असा विश्वास सौ.माया लोंढे यांनी व्यक्त केलाय . 

भ्रष्टाचारमुक्त कोनाळ, तिलारी धरण परिसरात पर्यटन प्रकल्प, पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न, कोनाळकट्टा येथील ग्रामपंचायतची जागा संपादित करून जुन्या ग्रामपंचायत इमारतीच्या जागी नविन इमारत, भूतनाथ मंदिर परिसरात सुशोभिकरण करणे, कोनाळ लोंढेवाडी भवानी मंदिर परिसर सुशोभिकरण करणे, तिलारी सिद्धेश्वर देवालय परिसर सुशोभिकरण, महिला बचत गटाला विविध उद्योग उभारण्यासाठी लघु  उद्योग, तिलारी येथे गणेश विसर्जन करण्यासाठी जाणारा रस्ता आदि कामांना जाहीरनाम्यात त्यांनी प्राधान्य दिले आहे. 

ग्रामविकास आघाडी पॅनल मध्ये स्वत सौ. माया दयानंद लोंढे सरपंच पदाच्या उमेदवार असून त्यांचे समवेत सरपंच पराशर सावंत, माजी उपसरपंच प्रीतम पोकळे, विशाखा लोंढे, शुभ्रा लोंढे व सुधाकर बांदेकर हे उमेदवार निवडणूक लढवीत असून सर्व उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास सरपंच पराशार सावंत यांनीही व्यक्त केला आहे.