
देवगड : ग्रामस्तरावर ग्रामसंघाची भुमिका जलजीवन मिशन अंतर्गत कार्यक्रमात महत्वाची असल्याचे प्रतिपादन क्षमता बांधणी व प्रशिक्षण ( JJM ) समन्वयक इंदिरा परब यांनी केली.यावेळी अधिक्षक कुणाल मांजरेकर , मास्टर ट्रेनर इंदिरा परब , गटसमन्वयक वैशाली मेस्त्री , पाणी गुणवत्ता तज्ञ हर्षदा बोथीकर , डाटा ऑपरेटर मोहिनी खडपकर, कनिष्ठ अभियंता प्रज्ञा पोवार आदी मान्यवर तसेच देवगड तालुक्यातील ग्रामसंघाची अध्यक्ष व सचिव अदी उपस्थित होते .
पुढे बोलताना इंदिरा परब म्हणाल्या जल जीवन मिशन अंतर्गत गावात पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी नियोजण , आराखडा ,अंमलबजावणी, व्यवस्थापन,तसेच देखभाल दुरुस्ती यासाठी ग्रामस्तरावर ग्रामसंघाची भुमिका महत्वाची असल्याचे क्षमता बांधणी व प्रशिक्षण ( JJM ) समन्वयक इंदिरा परब यांनी स्पष्ट केले .
या कार्यशाळेत ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती स्थापना , पुनञ्जीवन करणे , अपेक्षित लोकवर्गनी गोळा करणे , योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी व्यवस्था निर्माण करणे , समित्यांचे बैठकीचे आयोजन करणे , सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन इ . विषयांच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीस सहाय्यक करणे अशा अनेक प्रकारच्या ग्रामसंघाने करावयाची कार्याचे मार्गदर्शन मास्टर ट्रेनर इंदिरा परब व सहाय्यक गटविकास अधिकारी देवगड दिगंबर खराडे यांनी केले .जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत गावांमध्ये अंमलबजावणीसाठी सहाय्य संस्था म्हणून इच्छुक व सक्षम ग्रामसंघाची निवड करणेबाबत तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बचत गटांची नियुक्ती करणेबाबतची कार्यशाळा पंचायत समिती देवगड येथील सभागृहात सहाय्यक गटविकास अधिकारी दिगंबर खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.