
कणकवली : ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी निवडणूक आयोगाचा सर्व्हर डाऊन होत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार यांना तासंतास ताटकळत आपला फॉर कधी सबमिट होणार याची वाट पहावी लागत आहे.त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने या ऑनलाइन फॉर्म भरण्याच्या प्रणालीमध्ये सुसूत्रता आणली तरच निवडणुकीचे ऑनलाइन फॉर्म भरू शकतात अन्यथा तारीख वाढवुन तरी मिळावी अशी अपेक्षा उमेदवार व्यक्त करत आहेत
सिंधुदुर्गात 18 डिसेंबर रोजी होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने 325 ग्रामपंचायत साठी नामनिर्देशन पत्रे भरण्यासाठी 28 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली मात्र सर्व्हर डाऊन चा फटका ग्रामपंचायत उमेदवारांना बसू लागला आहे. दिवसभरात एका केंद्रावरून चार ते पाच फॉर्म सबमिट होत आहे आणि उमेदवारांची संख्या हजारोच्या पटीत असल्याने 2 डिसेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल कशी होणार असा प्रश्न पडला आहे.तसेच तहसील कार्यालयात सकाळी 11 ते 3 या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जात आहेत त्यामुळे पुढील दोन दिवसात उमेदवारी अर्ज स्वीकारताना दमछाक होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एक तर सर्वर डाऊन आणि दुसऱ्या बाजूने अर्ज स्वीकारण्यासाठी दिवसातील केवळ चार तास या गडबडीत उमेदवार मात्र हैराण झाले आहेत. त्यामुळे
राज्य निवडणूक आयोगाने या ऑनलाइन फॉर्म भरण्याच्या प्रणालीमध्ये सुसूत्रता आणली तरच निवडणुकीचे फॉर्म भरले जातील