विविध उपक्रमातून चांगलं शिक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध : एकनाथ शिंदे

Edited by: विनायक गावस
Published on: February 10, 2024 09:48 AM
views 166  views

सावंतवाडी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ५१ व राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचा शानदार शुभारंभ  करण्यात आला. तसेच माजगाव धरण व सावंतवाडी नळपाणी योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला. याप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन व सावंतावडीतील विकासकामांच भुमिपूजन झालं असल्याचं मी जाहीर करत आहे. भारत व महाराष्ट्र विज्ञानाच्या दृष्टीने प्रगतीपथावर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरलेले विद्यार्थी   नव्या आधुनिक भारताचे घटक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील विज्ञान व संशोधनाला पंख देण्याच काम केलं आहे. विज्ञान क्षेत्रात देशान मोठं योगदान दिलं आहे. आज राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन सावंतावडीत होत आहे. यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व शिक्षण विभागाच यासाठी करावं तेवढं कौतुक थोड आहे. विविध उपक्रमातून चांगलं शिक्षण देण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे. नवं शैक्षणिक धोरण राबवीत आहे‌‌. मातृभाषेला व आपल्या संस्कृतीला यात महत्त्व दिलं आहे‌. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर आमचा अधिक भर आहे असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल. 

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर नाविन्यपूर्ण संकल्पना शिक्षण विभागात राबवीत आहेत‌. शासकीय शाळा खाजगी शाळेंच्या बरोबरीने आणण्याचा प्रयत्न ते करत आहेत. मराठी भाषा संवर्धनासाठी ते कार्यरत आहेत. आरोग्य, शिक्षण, कृषी, पायाभूत सुविधांना महत्व देणार आमचं सरकार आहे. यात शिक्षणाला अधिक प्राधान्य दिलं आहे‌. कौशल्य विकासाला गती देण्याच काम आम्ही करत आहोत. यांसह नळपाणी योजनेच्या शुभारंभ, धरणाचा शुभारंभ आज झाला आहे. यामुळे पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मदत होणार आहे‌. पावसाचं पाणी अडवून पाणी वाचविण्यासाठी असे प्रकल्प राबविण्यात येत आहे. शेतकरी वर्गाला यांचा फायदा होईल तसेच स्वच्छ व सुंदर शहरांसाठी मोहीम आम्ही हाती घेतली आहे‌. विकासाला गती देण्याच काम महायुती सरकार करत आहे. कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. राज्याचा सर्वांगीण विकास बोलून नाही तर तो आम्ही करुन दाखवत आहे. हे सरकार गतिमान सरकार आहे. धाडसी निर्णय घेणार सरकार आहे असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केले ‌