दोडामार्ग पिंपळेश्वर चौकात ध्वजारोहणाचा मान उज्वला गोवेकर यांना

Edited by: संदीप देसाई
Published on: January 28, 2024 14:23 PM
views 90  views

दोडामार्ग : दोडामार्ग शहरात पिंपळेश्वर चौक येथे प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्याचा सन्मान दोडामार्ग शहरातील जेष्ठ व्यापारी श्रीमती उज्वला गोवेकर यांना यावेळी मिळाला आहे. दोडामार्ग शहरात पिंपळेश्वर चौक येथे स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनी व्यापारी वर्ग व शहरवासीय ध्वजारोहण करतात. या ध्वजारोहणाचा मान शहरात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व सामाजिक क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या महनीय व्यक्तींकडून ध्वजारोहण केलं जात. यावेळी हा मान दोडामार्ग शहरातील प्रथितयश व्यवसायिक असलेले गोवेकर कुटुंबाला मिळाला आहे.

उद्योजक व व्यापारी शैलेश गोवेकर यांच्या मातोश्री श्रीमती उज्वला गोवेकर यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी देशाचा ध्वज फडकवण्याता आला. यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उप नगराध्यक्ष देविदास गवस, व्यापारी संघाचे अध्यक्ष सागर शिरसाठ, नगरपंचायत बांधकाम सभापती नीतन मणेरीकर, गौरी पार्सेकर, ज्योती जाधव, नगरसेवक संजय खडपकर, संतोष नानचे, चंदन गावकर, सौ. संध्या प्रसादी, संजना म्हावलंकर, सोनाली म्हावळणकर, श्रेयाली गवस, चंदन गावकर, उद्योजक शैलेश गोवेकर, प्रदीप चांदेलकर आदी उपस्थित होते. दोडामार्ग इंग्लिश स्कूलच्या मुलांनी बामणीकर सर यांच्या नेतृत्वाखाली ध्वजाला वंदना दिली. त्यानंतर देशभक्तीपर गीत गायन व देशाभिमानाच्या घोषणा देण्यात आल्या. शहरातील सर्व व्यापरीवर्ग, नागरिक व शाळकरी विद्यार्थी याप्रंसगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.