कुलसचिव डॉ. संतोष सावर्डेकर यांची सदिच्छा भेट

Edited by: मनोज पवार
Published on: July 05, 2025 16:23 PM
views 60  views

चिपळूण : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली चे नवनिर्वाचित कुलसचिव डॉ. संतोष सावर्डेकर यांनी नुकतीच गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय तसेच जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण यांना सदिच्छा भेट दिली. कुलसचिवपदी निवड झाल्यानंतर त्यांची ही पहिलीच भेट होती.

यावेळी बोलताना डॉ. सावर्डेकर म्हणाले, "आज मी या पदापर्यंत पोहोचलो, त्यामागे माननीय डॉ. तानाजीराव चोरगे सर यांचा लाखमोलाचा पाठिंबा व सततचे मार्गदर्शन हे एक कारण आहे. " कुलसचिव डॉ. संतोष सावर्डेकर यांनी विद्यापीठाच्या माध्यमातून या दोन्ही महाविद्यालयांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. कदम यांनी कुलसचिवांचे उत्स्फूर्त स्वागत व सत्कार केला व त्यांना नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे,  उपाध्यक्ष निखिल चोरगे, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. एस. एन. चोरगे,तसेच इतर प्राध्यापकवृंद  उपस्थित होते.