जनता - कार्यकर्ते यांच्या सदिच्छामुळे काम करायला प्रोत्साहन मिळते : केसरकर

मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांसह राणेंनीही दिल्या केसरकरांना शुभेच्छा
Edited by: विनायक गांवस
Published on: July 18, 2024 14:18 PM
views 109  views

सावंतवाडी : शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी दिल्या. तसेच राज्यपाल रमेश बैस यांनी पत्र पाठवून शुभेच्छा दिल्या. कुटुंबियांकडून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी जनता व कार्यकर्ते यांच्या सदिच्छामुळे काम करायला प्रोत्साहन मिळते असे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

आषाढी एकादशी, पाऊस आणि शेतीचा हंगाम यामुळे लोकांना अडचणी निर्माण होतात म्हणून मंत्री दीपक केसरकर यांनी मतदार संघात उपस्थित राहून वाढदिवस साजरा करणार नाही असे म्हटले होते. त्यांनी मुंबईत कुटुंबासमवेत वाढदिवस साजरा केला. मात्र सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यात कार्यकर्त्यांनी विविध उपक्रम आयोजित करून वाढदिवस साजरा केला.

राज्याचे शालेय शिक्षण तसेच मराठी भाषा मंत्री, मुंबई शहराचे पालकमंत्री आणि मंत्रिमंडळातील माझे सहकारी दीपक केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास सुदृढ व उदंड आयुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना वाढदिवसाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा एक्स ट्विटर हँडल वरून दिल्या आहेत. विधिमंडळातील माझे सहकारी मंत्री दीपक केसरकर जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा एक्स  ट्विटर हँडल वरून  दिल्या आहेत. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे , मंत्रीमंडळातील सहकारी आणि शिवसेना व भाजप मधील मान्यवर व कार्यकर्ते यांनी मंत्री केसरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच असंख्य मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतकांनीही शुभेच्छा दिल्या.  दरम्यान, मुंबई येथील निवासस्थानी कुटुंबियांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी सावंतवाडीच्या माजी नगराध्यक्ष, सौभाग्यवती पल्लवी केसरकर, कन्या सोनाली, जावई सिद्धार्थ वगळ, नातू अर्जून आदी उपस्थित होते.