
सावंतवाडी : महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी बांदा शहरात जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी शहरातील श्री देव बांदेश्वर चरणी श्रीफळ वाढवत डोअर टू डोअर प्रचार करण्यास भर दिला आहे. यावेळी तालुकाप्रमुख मायकल डिसोझा, रियाज खान साई काणेकर ज्ञानेश्वर एडवे अभि देसाई श्रीकांत धोत्रे बाळा बहिरे प्रसाद पावसकर सुशांत पांगम गजानन गायतोंडे निशू पावसकर दया कुबल मंथा सावंत आदी उपस्थित होते. त्यांनी बांदा शहरातील बाजारपेठेत व्यापाऱ्यांची आणि ग्राहकांशी चर्चा केली. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मी कटीबद्ध आहे असे आश्वासन दिले. यावेळी त्यांना बाजारपेठेत उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.