
सावंतवाडी : आंबोलीमध्ये गुरुवारी सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुख्य धबधब्यासह इतर छोटे मोठे धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाले आहेत. जाणकारांच्या मतानुसार हा पाऊस असाच सुरू राहिल्यास हा धबधबा पूर्ण क्षमतेने चालू राहील. पावसाने जर पुन्हा दडी मारली तर मात्र धबधबा पुन्हा एकदा ओसरेल.
सध्यातरी आंबोली मुख्य धबधबा प्रवाहीत झाल्याने वर्षा पर्यटन प्रेमीत आनंदाच वातावरण आहे. या रस्त्यावरून ये-जा करणारे वाहन चालक, पर्यटक या ठिकाणी थांबून या धबधब्याचा आनंद घेताना दिसून येत आहेत. आंबोलीत आज सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे सर्वत्र छोटे-मोठे धबधबे प्रवाहीत झालेले दिसून आले आहेत.