
कुडाळ : कुडाळ एमआयडीसी लगत असलेल्या नेरूर गावातील गोंधयाळे वाडीत जाणारा रस्ता विकासकाकडून अडविण्यात आला असून सदरील जागेचा प्लॉट विकासाकला मंजूर झाल्याने या प्लॉटमधील जाणारा रस्ता हा स्वमालकीचा असल्याचे विकासक सांगत असून भविष्यात आम्हाला येजा करण्यासाठी रस्ता नसल्याने होणाऱ्या गरसोई विरोधात नेरूर गोंधयाळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. मंगळवारी ९ जानेवारी रोजी तहसीलदार अमोल फाटक यांची भेट घेणार आहेत. मात्र वेळीच तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कुडाळ एम आय डि सी येथे नेरूर गोंधयाळे वाडीत जाणाऱ्या रस्त्या सामाजिक कार्यकर्ते अजित गणपत मार्गे यांनी पाठपुरावा केला होता. यावेळी त्यांना 27 जुलै 2021 रोजी दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, कुडाळ औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक जी 13 मधून पाच मीटर रुंदीचा रस्त्याची मागणी तत्वता मंजूर करण्याचे महामंडळाने ठरविले आहे. या आशियाचे पत्र सामाजिक कार्यकर्ते अजित गणपत मार्गी यांना पाठविण्यात आले होते. मात्र सद्यस्थितीत हा मार्ग विकासाकाकडून अडविण्यात आला आहे. यामुळे गोंधयाळे वाडीतील नागरिकांना येजा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर सोमवारी गोंधयाळे ग्रामस्थांनी एकत्र येत मंगळवारी तहसीलदार अमोल पाठक यांची भेट घेण्याचे ठरविले आहे. मात्र या दरम्यान कोणताही तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
यावेळी गोंधयाळे येथील अजित मार्गी, दादा चव्हाण, माजी सरपंच प्रसाद पोईपकर, प्रभाकर गावडे, सिद्धेश देसाई, शाम गावडे, महेश राणे, काका गावडे, रामा कांबळी, शारदा गावडे, किरण गावडे, प्रसाद जावकर, तुषार गावडे, प्रसाद गावडे, धीरज परब, हेमंत जाधव, कुणाल किनळेकर, मोहिनी राणे, महेश गावडे, चिन्मय राणे, शिवा लाड, मंगेश झोरे, धर्माजी गावडे, रोषन गावडे, मंगेश धुरी, नाना गावडे, बाळा मार्गी, कृष्णा मार्गी, मोहिनी मार्गी आदी गोंधयाळे वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
कुडाळ एम आय डि सी येथील नेरूर गोंधयाळे येथील नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत आपण मंगळवारी कुडाळ एमआयडीसी येथील अधिकाऱ्यांची भेट घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र अधिकाऱ्यांकडून कोणताही तोडगा निघाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्टाईलने कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी दिला आहे.