हापूस आंब्याला सोन्याचा दर ?

2500 ते 3500 रुपये डझन
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 20, 2026 12:11 PM
views 93  views

देवगड : देवगड हापूस आंब्याला आता सोन्याचे दर प्राप्त झाले आहेत. कारण यावर्षी आंब्याचे उत्पादन मागील वर्षीपेक्षा कमी प्रमाण आहे आणि त्यामुळेच हे आंब्याचे दर वाढले आहेत. 

सिंधुदुर्गातील कणकवली, कुडाळ, देवगड बाजारामध्ये देखील हापूस आंबा काही क्वचित प्रमाणात व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. पण त्यांचा दर देखील 2500 रुपये ते 3500 रुपये डझनने असल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे हापूस आंब्याला सोन्याचा भाव आल्याचे दिसत आहे.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर यंदा हापूस आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाशी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गुरुवार दि. १९ रोजी कोकणातून एकूण १३ हजार ९२५ पेट्या हापूस आंब्याची आवक झाली. मात्र गतवर्षी याच दिवशी तब्बल ४० हजार पेट्यांची आवक झाल्याने यंदाच्या तुलनेत मोठी घट नोंदवली गेली आहे.