सुवर्ण पदक विजेते जलतरण प्रशिक्षक दीपक सावंत यांचा सत्कार !

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, बंटी माठेकर यांचा पुढाकार
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: February 04, 2023 19:36 PM
views 212  views

सावंतवाडी : जागतिक स्तरावर विश्वविक्रम करून जलतरण स्पर्धेत आपल्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांकडून वर्ल्ड रेकॉर्ड करून घेणारे गोल्ड मेडलिस्ट जलतरण प्रशिक्षक, सावंतवाडी शहराचे सुपुत्र दीपक सावंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते तसेच छत्रपती राजा शिवाजी महाराज चौक मित्र मंडळचे अध्यक्ष बंटी माठेकर व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सन्मान करण्यात आला.

दीपक सावंत यांनी अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये शिक्षण घेत स्विमिंग क्षेत्रात विद्यार्थ्यांचे कोच म्हणून, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जलतरण प्रशिक्षण क्षेत्रामध्ये मोलाची कामगिरी केली आहे. त्यांनी स्विमिंग क्षेत्रामध्ये वेंगुर्ला व सावंतवाडी शहरात अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन जलतरणपटू घडवले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जलतरणा संदर्भात कोणत्याही सोयी-सुविधा नसताना, जिल्ह्यामध्ये दोन वेळा वर्ल्ड रेकॉर्ड करून दोन वेळा जलतरण गोल्ड मेडलिस्ट विद्यार्थी घडवल्यामुळे ते कौतुकास पात्र ठरलेले आहेत. तसेच ते राजा छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ चौक याचे सचिव म्हणूनही काम पाहतात. मंडळातर्फेही त्यांचा भव्य सरकार करण्यात आला. याप्रसंगी माजी नगरसेवक सुरेश भोगटे, मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, उपाध्यक्ष बंड्या कोरगावकर, उपाध्यक्ष विजय पवार, महासचिव महादेव राऊळ, सत्यवान राऊळ, चिनू खानोलकर, प्रांजल सावंत व सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव आदि उपस्थित होते.