झोळंबेत उद्यापासून विठूनामाचा गजर !

१७ पासून अखंड हरिनाम सप्ताह
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 16, 2023 15:34 PM
views 42  views

दोडामार्ग : झोळंबे तालुका दोडामार्ग येथील वैकुंठवासी ह.भ.प.परमपुज्य सद्गुरू वासुदेव महाराज वझे यांच्या आश्रयाखाली चालत असलेल्या श्री पांडुरंग मंदिरात, रविवार १७ ते रविवार २४ दरम्यान सात दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. यंदाचे वर्ष हे प.पु. सद्गुरू वासुदेव महाराज यांचे अमृतमहोत्सवी समाधी सोहळा वर्ष असल्याने संत तुकाराम महाराज वारकरी संप्रदाय अनुयायी भक्त मंडळींनी सप्ताह निमित्ताने सातही दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.


 या दरम्यान रोज सकाळी ८ ते १२ या  वेळात संत तुकाराम महाराज गाथा पारायण होईल, पहीला दिवस रविवार १७ रोजी सकाळी तुकाराम महाराज गाथा पारायण  दुपारी महाप्रसाद संध्याकाळी ३ वा.सदगुरू सेवक  जयानंद गोपाळ सावंत यांचे वारकरी कीर्तन ६ वा. हरिपाठ व दिंडी रात्री १० वा. मंदार जोशी,विराज धुपकर, श्रीकृष्ण गोरे, शैलेश खाडिलकर, देवेंद्र सुतार यांचा अभंगवाणी कार्यक्रम तदनंतर झोळंबे येथील स्थानिकांचे भजन. दुसरा दिवस सोमवार १८ रोजी संध्याकाळी ३ वा. ह.भ.प. वासुदेवबुवा सडवेलकर यांचे नारदिय कीर्तन रात्री १० वा. सिद्धिविनायक महिला भजनी मंडळ साळ यांचे भजन व नंतर सौ.माधुरी मराठे यांचे भक्ती संगीत. तिसरा दिवस मंगळवार १९ रोज़ी संध्या.३वा. ह.भ.प. विजयानंद मालपेकर यांचे नारदिय कीर्तन नंतर प्रवचन, हरिपाठ, दिंडी व भजन चौथा दिवस बुधवार २० रोजी संध्या. ३ वा. प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. उद्धवबुवा जावडेकर यांचे नारदिय कीर्तन त्याना संवादिनीवर श्रीकृष्ण नार्वेकर तबल्यावर  गजानन नार्वेकर साथसंगत करतील ७ वा.हरिपाठ, दिंडी, रात्री ओंकार नवरात्र उत्सव मित्रमंडळ सावंतवाडी यांचा भक्तिगीत, भावगितांचा कार्यक्रम होईल. पांचवा दिवस गुरूवार २१ रोजी ३ वा. सद्गुरू सेवक दिपक पालयेकर यांचे वारकरी कीर्तन, ७ वा. हरिपाठ, दिंडी १० वाजता माऊली भजनी मंडळ कोलझर यांचे भजन व नंतर विश्र्वास मेस्त्री भावभक्ती गितांचा कार्यक्रम सादर होईल

 सहावा दिवस शुक्रवार २२ रोजी ३ वा. ह.भ.प. विष्णुबुवा गवस‌ यांचे नारदिय कीर्तन नंतर माळकर गुरुजी यांचे प्रवचन रात्री ओंकार शारदा शेटकर,नुतन रेवडकर, तन्वी च्यारी,रोशन राऊत, ॠत्वीक सावंत यांचा संगिताचा कार्यक्रम. सातवा दिवस शनीवार २३ रोजी ३ वा.ह.भ.प.वासुदेव बाळकृष्ण वझे (बाबी महाराज)यांचे वारकरी कीर्तन. त्यानंतर दिपोत्सव होईल व  नंतर स्थानिकांचे भजन सादर केले जाईल. २४ रोजी पहाटे ५ वा.गवळणकाला, संत तुकाराम महाराज गाथा पारायण समाप्ती, महाप्रसाद, सद्गुरू सेवक जयानंद सावंत काल्याचे किर्तन व नंतर दिंडी, महाप्रसादाने अखंड हरिनाम सप्ताहाची समाप्ती होईल.