LIVE UPDATES

चालत्या कंटेनरमधून रस्त्यावर उडी...बकरी थेट विद्यूत वाहिनीत फसली

Edited by: विनायक गांवस
Published on: July 09, 2025 18:37 PM
views 161  views

सावंतवाडी: चालत्या कंटेनरमधून रस्त्यावर उडी मारल्याने बकरी थेट प्रवाहीत असलेल्या विद्यूत वाहिनीत अडकली. आज दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. 

त्यानंतर वीज पुरवठा खंडीत करून त्या बकरीला तारेतून सुखरूप सोडविण्यात आले. दुपारच्या सुमारास उपरलकर देवस्थान परिसरात सावंतवाडी बेळगाव रस्त्यावर ही घटना घडली. गुजरात येथील काही बकरी व्यवसायीक चार ते पाच मोठ्या कंटेनरने बकऱ्या घेऊन कोल्हापूरच्या दिशेने जात होते. त्यातील एका कंटेनर मध्ये असलेल्या बकरीने गाडीतून थेट बाहेर उडी मारली आणी ती रस्त्याच्या बाजूला असलेल्या वीज वाहिन्यावर जाऊन लोंबकळत अडकली. हा प्रकार चालकाच्या लक्षात आल्याने तात्काळ गाडी थांबवली. मात्र वीज वाहिनी सुरू असल्यामुळे बकरीला सोडवता येणे शक्य झाले नाही. तेथून जाणा-या प्रवाशांनी मदतकार्य सुरू झाले. वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना फोन करत पुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतर वीज कंपनीचे कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले. सर्वांनी मिळून त्या बकरीला लाकडाच्या सहाय्याने सुखरूप सोडवले. संबंधित चालक त्या बकरीला घेऊन तिथून निघून गेला. हा प्रकार पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर तसेच महावितरण कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.