गोवा बनावट अवैध दारू वाहतूकीवर कारवाई

2 लाख 45 हजार 100 रुपयाचा मुद्देमाल जप्त
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: November 22, 2023 20:06 PM
views 339  views

कुडाळ : गोवा बनावट अवैध दारू वाहतूक प्रकरणी कुडाळ पोलीसांनी मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे बॉक्सवेल येथे कारवाई करत दोन लाख 45 हजार 100 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.


बिबवणे बॉक्स वेल येथे अल्टो क्र. MH07- H1795 या कारने गोवा बनावट दारूची वाहतूक होत असल्याचे पोलिसांना समजले होते यावेळी सापळा रचत संशयित संतोष पांडुरंग देऊलकर यांच्या गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये अवैध दारू आढळून आली. बुधवारी पहाटे एकच्या सुमारास ही कारवाई कुडाळ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला, पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा परुळेकर, होमगार्ड कृष्णा गावडे महेश गोलतकर यांनी केली. याची फिर्याद पोलीस नाईक  स्वप्निल तांबे यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. तर संशयित आरोपी संतोष पांडुरंग देऊलकर याला भादवि कलम 41 नुसार नोटीस बजावण्यात आली आहे.  या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे करत आहेत.