सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव...!

Edited by: विनायक गांवस
Published on: June 13, 2024 08:23 AM
views 251  views

सावंतवाडी : सावंतवाडी मर्कझी जमात, बॉम्बे संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक वर्ष २०२३ - २४ एस् . एस् . सी परिक्षेला प्रविष्ठ झालेल्या सर्व  विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत प्रशालेच्या १००% निकालाची यशस्वी परंपरा कायम ठेवली. यामध्ये प्रथम .कु. आमना नासीर गवंडी ( ९४ .६० % )  , द्वितीय कु .झैद इफ्तेखार अहमद बेग (९१% ) तृतीय कु . प्रविण पप्पुराम सैनी (९०.४० %) तर कु . रय्यान रिझवान पटेल (८९ .८० %) गुण मिळवून चौथा आणि कु. आर्या महेश आळवे  (८९ .२० % ) गुण मिळवून पाचवी आली.  तसेच १८ विद्यार्थी विशेष प्राविण्य  आणि ९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवसोहळा बुधवार रोजी प्रशालेत संपन्न झाला. या गुणगौरव सोहळ्याला सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संस्थेचे अध्यक्ष इम्तियाज खानापूरी , उपाध्यक्ष नासीर शेख व उपाध्यक्षा श्रीम. निलोफर बेग ,सचिव हिदायतुल्ला खान ,  सहसचिव सुलेमान बेग ,सदस्य. परवेज बेग, प्रशालेच्या मुख्याध्यापिका निर्मला हेशागोळ , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , दहावी वर्गांच्या पालक प्रतिनीधी श्रीम. मुमताज  बंगलेकर गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

 प्रशालेच्या मुख्याधापिका श्रीम. निर्मला हेशागोळ यांनी पुष्प देऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.सहाय्यक शिक्षिका श्रीम. मेहराज शेख व श्रीम. निलम सावंत यांनी विद्यार्थ्यांच्या निकालाचे वाचन केले. सर्व विद्यार्थ्यांना गुणपत्रक व पुष्प देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अनुक्रमे प्रथम तीन विद्यार्थी कु . आमना   गवंडी , कु . झैद बेग , कु . प्रविण सैनी यांना पुष्पगुच्छ व धनादेश देऊन प्रशालेच्यावतीने त्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांमधून कु . आमना गवंडी, कु. मसिया आत्मेडा, कु . आर्या आळवे  यांनी आपले मनोगत व्यक्त केले . इयत्ता दहावी वर्गाच्या पालक प्रतिनीधी  श्रीम.मुमताज बंगलेकर  यांनी आपल्या मनोगतातून प्रशालेचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संस्थेचे सहसचिव सुलेमान बेग यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षिका यांचे कौतुक करत  विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व यशस्वी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या . संस्थेचे सचिव हिदायतुल्ला खान यांनी विद्यार्थ्याची  बुद्धिमत्ता व गुणवत्ता ओळखून  आवडीनुसार क्षेत्र निवडण्याचा सल्ला पालकांना दिला. सर्व विदयार्थ्यांनी  जिद्दीने आपले ध्येय प्राप्त करावे ,असे मौलिक विचार संस्थेच्या उपाध्यक्षा निलोफर बेग यांनी आपल्या मनोगतातून  व्यक्त केले‌. उपस्थित सर्वांनीच प्रशालेचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .