आदर्श सरपंच प्रवीण पंडित यांचा गौरव

विशाल परब - अँड अनिल निरवडेकर यांच्याकडून सन्मान
Edited by: विनायक गांवस
Published on: September 30, 2025 19:21 PM
views 95  views

सावंतवाडी : आदर्श सरपंच प्रवीण पंडित यांचा भाजपा युवा नेता विशाल परब आणि अँड अनिल निरवडेकर यांच्याकडून गौरव करण्यात आला.  महाराष्ट्र राज्याचा मानाचा 'आदर्श सरपंच' पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. आदर्श सरपंच' सावंतवाडी तालुक्यातील कास गावाचे सरपंच प्रवीण पंडित यांचा मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला. युवा नेते विशाल परब आणि अँड. अनिल निरवडेकर यांनी संयुक्तपणे प्रवीण पंडित यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. 

श्री. पंडित यांनी आपल्या कार्यकाळात कास ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उल्लेखनीय काम करत आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच त्यांना राज्याचा हा महत्त्वाचा पुरस्कार मिळाला आहे.

सत्कारावेळी बोलताना युवा नेते विशाल परब यांनी, "प्रवीण पंडित यांच्या नेतृत्वाने कास ग्रामपंचायतीला एक नवी दिशा दिली आहे. ग्रामीण विकासाचे त्यांचे कार्य निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी आहे," असे मत व्यक्त केले. तर अँड. अनिल निरवडेकर यांनी त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सत्कार समारंभास विठ्ठल पंडित, श्रीकांत पंडित, जयवंत पंडित, प्रमोद पंडित, समीर किंडलेकर, गोपाल पंडित, नकुल पंडित, पांडुरंग पंडित, देवांग पंडित, वैभव पंडित आणि रूपेश पंडित यांसह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्याने कास गावाचे नाव राज्यभर पोहोचले असून सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.