पत्रकार जय भोसले यांचा गौरव

Edited by: विनायक गांवस
Published on: June 08, 2025 19:19 PM
views 411  views

सावंतवाडी : सकल मराठा समाज सावंतवाडी आयोजित गुणवंत गौरव सोहळ्यात पत्रकार,क्रीडा समालोचक जय भोसले यांचा कुडाळ मालवणवचे आमदार निलेश राणे यांच्याहस्ते शाल,श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

आ. निलेश राणे यांच्या हस्ते विद्यार्थी व विविध क्षेत्रात योगदान दिलेल्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, माजी नगरसेवक खेमराज कुडतरकर, आंबोली शिवसेना विभाग प्रमुख दिनेश गावडे, सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सिताराम गावडे, प्रा. सतीश बागवे, प्रसाद परब, केसरी सरपंच राघोजी सावंत उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन व आरोग्य दूताना रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.