भोसले नॉलेज सिटीचा गौरव..!

Edited by: विनायक गावस
Published on: February 11, 2024 06:06 AM
views 67  views

सावंतवाडी : ५१ व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाच्या नियोजनामध्ये कोकणातील शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ब्रॅण्ड असणाऱ्या भोसले नॉलेज सिटीनं आयोनाचा भार उचलला आहे‌. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर यांना यशवंतराव भोसले इंटरनॅशल स्कुल सावंतवाडीची मजबूत साथ लाभली आहे. यासाठी तसेच संस्थेच्या दैदिप्यमान कामगिरी बद्दल या संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले यांचा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व शिक्षण विभागाच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला. 

तसेच भोसले नॉलेज सिटीच्या माध्यमातून उपस्थित मान्यवरांना गौरविण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी ऑनलाईन उपस्थिती होती. तर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर,जिल्हाधिकारी किशोर तावडे, शिक्षण संचालक राहुल रेखावार,मुख्यकार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, विज्ञान मंडळाच्या संचालिका राधा अतकरी, अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे संचालक कृष्णकुमार पाटील, विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे, तहसीलदार श्रीधर पाटील, सावंतवाडी न.प.चे मुख्याधिकारी सागर साळुंखे, शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, ॲड. निता सावंत, बाबु कुडतरकर, आर्किटेक्ट अमित कामत, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, नितीन मांजरेकर, म.ल.देसाई, गणेशप्रसाद गवस, राजू निंबाळकर, विज्ञान मंडळाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग काकतकर, माजगांव सरपंच डॉ.अर्चना सावंत, कुणकेरी सरपंच सोनाली सावंत, माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगांवकर आदी या सत्कार प्रसंगी उपस्थित होते.