गौरवास्पद, सावंतवाडी न.प. सलग तिसऱ्यांदा कोकण विभाग नं. १

Edited by: विनायक गावस
Published on: June 05, 2023 18:41 PM
views 278  views

सावंतवाडी : 'माझी वसुधंरा अभियानात'सावंतवाडी नगरपरिषद सलग तिसऱ्या वर्षी कोकण विभागात प्रथम आली आहे. तर राज्यात १६ वा क्रमांक प्राप्त केला आहे. सावंतवाडीकरांसाठी ही अभिमानास्पद बाब असून सावंतवाडी न.प.च्या अधिकारी व कर्मचारी वर्गांच अभिनंदन केले जात आहे.


'माझी वसुधंरा अभियानात'सावंतवाडी नगरपरिषद सलग तिसऱ्या वर्षी कोकण विभागात प्रथम आली आहे. तर राज्यात १६ वा क्रमांक प्राप्त केला आहे. याबाबतची माहिती उद्यान पर्यवेक्षक अधिकारी गजानन परब यांनी दिली. न.प. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कामाचं चीज झाल आहे. त्यामुळे सलग तीन वर्ष हे यश मिळू शकलं अस मत गजानन परब यांनी व्यक्त केल आहे. लवकरच बक्षीस वितरणाचा सोहळा आयोजित करुन सावंतवाडी न.प.ला गौरविण्यात येणार आहे. उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सावंतवाडीत येणार असल्यान त्यांच्या उपस्थितीत न.प.चा गौरव केला जाणार आहे.