
कुडाळ : एस.के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, पाट संचलित माध्यमिक विद्यालय माड्याचीवाडी प्रशालेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून ग्लोबल फौंडेशन पिंगुळी मार्फत ज्ञानज्योती शिष्यवृत्ती देण्यात आली.
गेली अनेक वर्षे ग्लोबल फौंडेशन मार्फत विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. संस्थेच्या या उदार धोरणामुळे ग्रामीण भागातील गरीब व होतकरू विद्यार्थी आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण करू शकतात .या वर्षी विद्यालयातील कुमारी. भूमी गावडे, कुमारी.चित्रा राऊळ, कुमारी.चैताली परकर ,कुमारी आर्या गावडे, व कुमारी.संस्कृती गावडे अशा पाच विद्यार्थिनी शिष्यवृत्ती जाहीर करून पुढील वाटचालीस मदत केली.
या करीता ग्लोबल फौंडेशनचे श्री.प्रसाद परब, श्री गुरु देसाई व स्वप्नील नाईक यांचे बहुमोल सहकार्य लाभले प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. बी.एस. रावण यांनी ग्लोबल फौंडेशनचे व ग्लोबल फौंडेशनच्या सर्व टीम चे आभार मानले.