
वैभववाडी : नापणे येथील काचेच्या पुलाच पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विनायक जोशी यांनी माहिती दिली.
नापणे धबधब्यावर ९९ लाख खर्चून सिंधू रत्न योजनेतून काचेचा पुल बांधण्यात आला. जो महाराष्ट्र राज्यातील पहीला काचेचा पुल ठरला आहे. सध्या हा पुल सा-यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. या पुलाचे मंगळवारी दि २२जुलै पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते दु.१२.३०वा.लोकार्पण होणार आहे.