घोणस जातीच्या सापाला जीवदान

Edited by: विनायक गावस
Published on: January 08, 2024 21:06 PM
views 265  views

सावंतवाडी : आरोंदा पिरवाडी येथील उमेश पोखरे यांच्या अंगणात जाळ्यात अडकलेल्या घोणस जातीच्या सापाला सर्पमित्र महेश राऊळ यांनी सुखरुप बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडले. यावेळी वनविभागाचे कर्मचारी आप्पासो राठोड,चंद्रकांत पडते आदी उपस्थित होते.

     भारतात आढळणाऱ्या चार विषारी सापापैकी हा एक अत्यंत विषारी साप आहे. पोखरे यांना आपल्या घराच्यासमोर जाळ्यामध्ये अडकलेला साप दिसला.त्यांनी याबाबत वनविभागाला कळविले.आणि सर्पमित्र महेश राऊळ यानांही सांगितले.महेश राऊळ यांनी माहिती मिळाल्यानंतर काही वेळात त्याठिकाणी धाव घेतली आणि त्या जाळ्यात अडकलेल्या सापाला सुखरुप पणे बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडले आणि जीवदान दिले आहे.