
सावंतवाडी : भटवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी माकडाचा जीव वाचवून त्याला वन वनविभागाच्या ताब्यात दिलं. विजेचा धक्का बसून माकड जमिनीवर कोसळून त्याला गंभीर दुखापत झाली होती.
तो जखमी माकड रस्त्यावर तळमळत असताना तेथील बँकेचे निवृत्त अधिकारी नंदकुमार प्रभुदेसाई यांनी सामाजिक कार्यकर्ते दीपक सावंत यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी लगेच घटनास्थळी दाखल होत भटवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय पेडणेकर ,लक्ष्मण कदम यांच्या मदतीने जखमी माकडावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर लगेचच त्यांनी वनविभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्या जखमी माकडाला त्यांच्या स्वाधीन केले. त्यांच्या या कार्याचे वनविभाग अधिकाऱ्यांनी कौतुक केले.