
मंडणगड : मंडणगड तालुका बौध्द समाजाच्यावतीने बौध्द धम्मियांचे सर्वोच्च धम्मस्थळ, महाबोधी महावीहार बौध्दांच्या ताब्यात द्यावे, 1949 चा बुध्दगया टेम्पल अंक्ट रद्द करावा, बिहार राज्यात महाबोधी महाविहाराचे मुक्तीसाठी उपोषण आंदोलन करणाऱ्या बौध्द भिक्कु व कार्यकर्ते यांच्यावर तेथील सरकार व प्रशासनाकडून सुरु असलेले अन्याय अत्याचार त्वरीत थांबवावेत या मागण्यासाठी मंडणगड तालुका बौध्द समाजाच्या वतीने दि. 7 फेब्रुवारी 2025 मंडणगड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातून भिंगळोली येथील तहसिल कार्यालयावर शांतता मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तालुक्यात बौध्द समाज बांधव हाजाराच्या संख्येने उपस्थित होते. तहसिल कार्यालयाचे आवारात समाज नेत्यांचे संबोधनानंतर मंडणगड तहसिल कार्यालयात राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री महाराष्ट्र व बिहार राज्य यांच्याकरिता जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनातील माहीतीनुसार बुद्धगया महाबोधी बुद्ध महाविहार मुक्त करण्यासाठी बौद्ध भिक्खू संघाने आणि कार्यकर्त्यांनी बुद्धगया येथे उपोषण आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनावर बिहार सरकार व प्रशासनाकडून होत असलेले अन्याय अत्याचार त्वरीत थांबवावेत अशी मागणी करण्यात आली आहे. बोधगया मंदिर कायदा 1949 धार्मिक अधिकारांचे उल्लंघन आहे. महाबोधी बुध्द विहार जागतिक वारसा स्थळ आहे. त्यांचे आध्यात्मिक व सांस्कृतिक महत्व आहे. याचे नियंत्रण गैर बौध्द बहुसंख्याक समितीकडे असणे ही मोठी अन्यायकार बाब आहे. त्यामुळे आम्ही भिक्खू संघाच्यावतीने सुरु असलेल्या उपोषण व आंदोलनास संपुर्ण तालुक्यातील बौध्द जनतेच्यावतीने पाठींबा देत असल्याचे तसेच याबाबात कारवाई न झाल्यास आज शांततमय मार्गाने झालेले आंदोलन क्रांतीच्या मार्गाने करू असे स्पष्ट करण्यात आले आहे. याची प्रशासनाने गंभीर दखल न घेतल्या सर्व परिणामांची जबाबदारी प्रशासनाची राहील ही बाबही नमुद करण्यात आली आहे.
निवेदनावर राजेश गमरे, दादासाहेब मर्चंडे, राजेश मर्चंडे, आदेश मर्चंडे, किरण तांबे, सुदर्शन सकपाळ, प्रदीप तांबे, दीनेश कासारे, किरण तांबे, रंजन येलवे, सुर्यकांत जाधव, सुभाष तांबे, संतोष कांबळे, विजय खैरे, नानु खैरे, विशाल जाधव, गणेश जाधव, बळीराम जाधव, जे.टी. कांबेळे, सम्यक जाधव, नितेश मर्चंडे, राजेश साळवी, यांच्या सह्या आहेत.