मला दिलत त्यापेक्षा अधिक प्रेम नारायण राणेंना द्या : दीपक केसरकर

Edited by: विनायक गावस
Published on: April 15, 2024 06:15 AM
views 436  views

सावंतवाडी : उमेदवार कुणीही असला तरी नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण एकदिलाने कार्य करू, मला तिनं वेळा जेवढं प्रेम विधानसभेला दिलत त्यापेक्षा अधिक प्रेम नारायण राणे यांना लोकसभेत द्या असं आवाहन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलं. माजगाव येथील महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते.

आपली माणसं ही शेवटी आपली माणसं असतात. मुंबईत राहून सिंधुदुर्गचा खासदार म्हणून काहीतरी केल्याच भासणाऱ्या माणसांना आपण कुणामुळे निवडून आलो याची जाणीव नसते‌. सावंतवाडीला बापुसाहेब महाराज, शिवराम राजेंची परंपरा आहे. इथले लोक मनापासून प्रेम देतात. मला तिनं वेळा जेवढं प्रेम विधानसभेला दिलत त्यापेक्षा अधिक प्रेम नारायण राणे यांना द्या असं आवाहन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलं. तर अद्याप उमेदवारी निश्चित झालेली नाही आहे.  शिवसेनेकडून किरण सामंत यांनी उमेदवारी मागितली आहे तर भाजपकडून नारायण राणेंच नाव सुचवले आहे. नारायण राणे हे पक्षाशी एकनिष्ठ असणार व्यक्तीमत्व आहे‌. माझी उमेदवारी जाहीर होईल तेव्हा होईल परंतू उमेदवार कुणीही असला तर महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्तांनी नरेंद्र मोदींसाठी दिवसरात्र एक करून काम केलं पाहिजे यासाठी ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला बळकट करण्याच काम केलं. नारायण राणेंच्या खात्याच्या  माध्यमातून उद्योजक तयार होत आहेत. त्यांनी प्रत्येकाला रोजगार देण्यासाठी ट्रेनिंग सेंटर उभारली आहेत. सावंतवाडीचा वारसा हा विचारांचा आहे. एककाळ काही वैचारीक मतभेदातून चूक घडली. त्या चुकीचं परिमार्जन हे मताधिक्यातून केलं जाईल असा शब्द दीपक केसरकर यांनी नारायण राणेंना दिला. येणाऱ्या काळात नारायण राणे यांना दिलेल्या प्रेमाची भरपाई त्यांचे सहकारी म्हणून आमच्या कामातून करू असं आश्वासन त्यांनी कार्यकर्तांना दिलं. उमेदवार कुणीही असला तरी नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण एकदिलाने कार्य करू. नारायण राणे यांनी मंत्री म्हणून नेहमी सिंधुदुर्गचा विचार केला. आता त्यांनी केलेल्या कामांची उतराई करण्याच आपलं कर्तव्य आहे. प्रचंड बहुमताने त्यांना निवडून द्यावं व महायुतीला मत मिळेल यासाठी प्रयत्न करावे असं दीपक केसरकर म्हणाले. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राजन तेली, अशोक दळवी, श्वेता कोरगावकर, मनिष दळवी, संजू परब, संदीप कुडतरकर, महेश सारंग, नारायण उर्फ बबन राणे, रेश्मा सावंत, डॉ. अर्चना सावंत आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.