नारायण राणे यांना सर्वाधिक मताधिक्य देऊ : उदय सामंत

Edited by:
Published on: April 19, 2024 09:25 AM
views 233  views

रत्नागिरी : कमी बोलू पण काम जास्त करू. ४०० पार करत असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्गतील खासदार म्हणून मोठ्या मताधिक्यानं विजयी झालेले असतील. शिवसेना म्हणून महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना विजयी करू  असं उदय सामंत यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे,  गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, आ.शेखर निकम, किरण उर्फ भैय्या सामंत आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.