
दोडामार्ग : सतत सुरु असलेल्या पावसामुळे दोडामार्ग तालूक्यातील शेतकऱ्यांच्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भात कापणीच्या वेळीस पाऊस पडल्याने भाताला कोंब फुटल्याचे दिसत आहे. त्यामुळे कृषी व महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ठाकरे सेनेचे दोडामार्ग तालुका प्रमुख संजय गवस यांनी केली आहे.
जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसाने सर्वत्रच हाहाकार माजवला आहे. शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे. ऐन दिवाळी सणात भात कापणी आणि पोहे काढण्याच्या सीजनला पावसाने सर्व भात पीकाचे मोठे नुकसान केले आहे. सर्वत्रच भाताला कोंब आल्याने येथील बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. एवढा पाऊस पडत असताना नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने येथील ठाकरे सेमचे दोडामार्ग तालुका प्रमुख संजय गवस व अन्य पदाधिकऱ्यांनी दोडामार्ग तहसीलदार व कृषी विभागाकडे पंचनामे करण्याची मागणी केली आहे.










