
सावंतवाडी : भटवाडी येथील परांजपे कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संजय पेडणेकर यांच्या जवळ रुग्णांच्या सेवेसाठी बारा हजार रुपये किमतीची व्हीलचेअर भेटवस्तू म्हणून दिली. या व्हीलचेअर रुग्णांच्या सेवेसाठी आपण देत आहोत असे ते म्हणाले. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सेवाभावी कार्य हे कौतुकास्पद आहे आणि ही संस्था शहरातच नव्हे तर गावागावांमध्ये जाऊन सामाजिक कार्य करते याची दखल घेऊन आपण या संस्थेला रुग्णांच्या सेवेसाठी व्हीलचेअर देऊन छोटीशी मदत करत आहोत असे ते पुढे म्हणाले. सामाजिक बांधिलकीचे कार्याध्यक्ष संजय पेडणेकर यांनी परांजपे कुटुंबीयांचे आभार मानले. या प्रसंगी संस्थेचे सदस्य शामराव हळदणकर उपस्थित होते.