सोनुर्ली माऊली मंदिरास व्याक्युम क्लीनर भेट

Edited by: विनायक गांवस
Published on: August 16, 2024 09:10 AM
views 192  views

सावंतवाडी : दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेले सावंतवाडी प्रसिद्ध देवस्थान असलेल्या श्री देवी माऊली सोनुर्ली येथे मंदिरात स्वच्छता करण्यासाठी व्याक्युम क्लीनरची असलेली गरज ओळखून मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर यांच्या प्रयत्नातून व श्रीकृष्ण डेव्हलपर्सचे मालक काका केसरकर यांच्या माध्यमातून व्याक्युम क्लीनर प्रदान करण्यात आला. त्याबद्दल देवस्थान समितीतर्फे त्यांचे आभार मानण्यात आले.

यावेळी मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर,माजी सभापती राजू परब,माजी सरपंच नीलेश कुडव,विजयानंद नाईक,सोनुर्ली ग्रामस्थ बाळा गावंकर,उत्तम नाईक,ज्ञानेश्वर गावकर,रामचंद्र गावकर,लवू मडूरकर,भिकाजी जाधव,मनोहर गावकर,अनिल गावकर,आदी ग्रामस्थ उपस्थित होते. मंदिरातील स्वच्छेतेसाठी व्याक्युम क्लीनरची आवश्यकता असल्याचे तेथील मानकरी बाळा गावकर यांनी मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर यांना म्हटले होते.या पार्श्वभूमीवर हनुमंत पेडणेकर यांनी मळगाव येथील बांधकाम व्यवसायिक तथा श्रीकृष्ण डेव्हलपर्सचे प्रोपायटर काका केसरकर यांच्याकडे त्याबाबत पाठपुरावा केला होता.स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हा व्याक्युम क्लीनरली मंदिरात जात मंदिर समितीच्या स्वाधीन करण्यात आला.याबाबत मंदिर समितीने आभार व्यक्त केले आहेत.