राजू मसुरकर यांच्याकडून मेडिकल साहित्य भेट..!

Edited by: विनायक गावस
Published on: October 03, 2023 13:15 PM
views 70  views

सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी राजू मसुरकर यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त रुग्णालयाला गोरगरीब रुग्णांना उपचार करण्याकरिता मेडिकल साहित्य (निबुलायजर) तसेच मेडिकल साहित्य रुग्णालयाला भेट दिली. आज त्यांचा वाढदिवस असून या निमित्ताने त्यांनी हा उपक्रम राबविला असून याप्रसंगी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. मुकुंद अंबापूरकर मेंदू रोग व हृदयरोग तज्ञ डॉ. प्रवीण देसाई बालरोगतज्ञ व डॉ. चिन्मय हे डॉ.डि वाय पाटील कॉलेज या प्रसंगी उपस्थित होते.