मुणगेतील भगवती हायस्कूलला प्रयोग साहित्य भेट...!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 06, 2023 18:24 PM
views 195  views

देवगड : देवगड तालुक्यातल्या मुणगे कारीवणेवाडी येथील अभिजित सावंत व महेश सावंत यांनी श्री भगवती हायस्कुलच्या प्रयोगशाळेसाठी विज्ञान साहित्य भेट दिले आहेत. या साहित्यामध्ये सूक्ष्मदर्शक, विविध काचपट्टी, ध्वनीचे परावर्तन बोर्ड, ब्यारोमिटर, श्वसन संस्था, होपचे उपकरण, ओहोम उपकरण आदी साहित्याचा समावेश आहे. यासाठी प्रशालेचे शिक्षक प्रसाद बागवे यांनी लक्ष वेधले होते.

साहित्य भेट देताना संस्था व्यवस्थापक आबा पुजारे, मुख्याध्यापिका एम. बी. कुंज, शिक्षक प्रसाद बागवे उपस्थित होते. साहित्य भेट दिल्याबद्दल सावंत बंधुंचे आभार मानण्यात आले.