श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर पडेलला संगणक संच भेट...!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 25, 2024 12:54 PM
views 156  views

देवगड : देवगड पंचायत समिती येथील हवालदार तथा सामाजिक कार्यकर्ते यांनी सामाजिक बांधिलकीतून श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर पडेलला संगणक संच भेट दिला आहे. रमेश चव्हाण यांचा कला, क्रिडा, सांस्कृतिक कार्यक्रमातही चांगला सहभाग असुन त्यांनी HIV + मुलगा दत्तक घेऊन त्याचे पालकत्व केले आहे. तसेच ३२ वेळा रक्तदान केले असुन त्यांचा रक्तदान शिबीर आयोजन करण्यातही मोठा सहभाग असतो. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करून प्राण वाचवणे, तसेच क्रिकेट स्पर्धामध्येही विनामुल्य पंच म्हणून गेल्या ३५ वर्षे काम करीत आहेत.

त्यांच्या या समाजिक कार्याचा गौरव करत श्रीराम माध्यमिक विदयामंदीर पडेलचे मुख्याध्यापक हिराचंद तानवडे यांनी कौतुक करत त्यांचे शाळेमार्फत अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती माजी आमदार अजित गोगटे, मुख्याध्यापक  हिराचंद तानवडे , संस्था चेअरमन ओ. डी के पडेलकर, अत्तार सर, चव्हाण सर, मिलिंद पाटणकर सर, जाधव सर,  प्रसाद पाटणकर सर,  मंगेश तानवडे सर,  शेलटकर सर,  काळसेकर सर आणि  बागुल व  अजित तानवडे आदी मान्यवर उपस्थित होते.