नाग्या महादू वसतीगृहाला भेट वस्तू

नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा उपक्रम
Edited by: विनायक गांवस
Published on: April 10, 2025 18:58 PM
views 38  views

सावंतवाडी  : माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसा निमित्त सावंतवाडी येथील भाजपा पदाधिकारी व नगरसेवक यांच्याकडून कातकरी समाजाच्या मुलांच्या वेताळ बांबार्डे येथील नाग्या महादू निवासी वसतीगृहाला भेट वस्तू व कपडे भेट देत अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.

याप्रसंगी माजी नगरसेवक, सभापती अॅड. परिमल नाईक, सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी,  उदय नाईक, गुरू मठकर, शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळे, वसतीगृह संचालक उदय आईर, एन. जी. ओ. भार्गव शिरोडकर, सौ. शिरोडकर तसेच वसती गृहातील मुले उपस्थित होती. या प्रसंगी सर्व मुलांना शैक्षणिक दृष्टया आवश्यक असेल सर्व सहकार्य व वसतीगृहाविषयी शानस पातळीवर खास. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार निलेश राणे व आमदार दीपक केसरकर यांच्या यांच्या माध्यमातून भविष्यात वसतिगृहाच्या हीत व कल्याणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येईल याची ग्वाही उपस्थितांकडुन देण्यात आली