थोडक्यात अनर्थ टळला ; वेत्ये सरपंचांच्या दुचाकीत दिसला घोणस

Edited by: विनायक गावस
Published on: June 27, 2023 10:02 AM
views 846  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांच्या दुचाकीवर आज सकाळी घोणस जातीचा साप आढळून आला. श्री. गावडे नेहमी प्रमाणे दुचाकीजवळ असता अचानक घोणस निदर्शनास आला. सावधगिरी बाळगत त्यांनी आपला जीव वाचवला. त्यानंतर त्याला वेत्ये येथील सर्पमित्र यांनी पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. सरपंच गुणजी गावडे हे आज सकाळी आपल्या दुचाकी घेऊन कामानिमित्त बाहेर पडत असताना त्यांना दुचाकीपाशी घोणस असल्याचे समजले. त्यांनी ही खबर तात्काळ गावातील आपल्या सर्पमित्रांना दिली. मोठ्या शिताफीने घणसास पकडून जंगलमय भागातील नैसर्गिक अधिवासात सोडले.