घावनळे श्री स्वामी समर्थ मठात रक्तदान - रक्तदाब आणि मधुमेह तपासणी शिबीर..!

Edited by: दिपेश परब
Published on: July 01, 2023 21:12 PM
views 223  views

वेंगुर्ला : गुरुवर्य गुरुमाऊली यांच्या वाढदिवसानिमत्त श्री स्वामी समर्थ मठ घावनळे- कासमळा येथे रक्तदान शिबिर आणि रक्तदाब व मधुमेह तपासणी कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी स्वामी समर्थ मठाच्या गुरुवर्य गुरुमाऊली, गुरुवर्य दादा तसेच सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा वेंगुर्ला तालुका उपाध्यक्षराजेश पेडणेकर, सचिव श्रीकृष्ण कोंडुसकर, खजिनदार भूषण मांजरेकर, सदस्य राजाराम उर्फ आबा चिपकर, बाल सेवक श्रीराज कोंडूसकर आदी उपस्थित होते. या शिबिरासाठी ब्लड बँक सावंतवाडी डॉक्टर व सर्व स्टाफ,  ग्रामीण रुग्णालय कुडाळ NCD स्टाफ, समुपदेशक गायत्री कुडाळकर, हिंद लॅब कर्मचारी 

यशश्री कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या शिबिरात २६ रक्तदात्यांनी रक्तदान केले तर सुमारे १०० नागरिकांनी मधुमेह रक्तदाब तपासणी शिबिरातील सहभाग घेतला.