
सावंतवाडी : अर्चना घारेंनी मला शिक्षणातल काय कळत असे विधान कालच केलं होत. आज शिक्षकांनी माझा केलेलं सन्मान त्याचे उत्तर आहे. शिक्षकांच प्रेम आणि शिक्षण क्षेत्रातील कामाचे प्रतिक हे आहे. मुलांसह शिक्षकांचं प्रेम मी मिळवल आहे असे विधान महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शिक्षक संघटनेकडून केसरकरांचा खास सन्मान करण्यात आला. यानंतर ते बोलत होते.
ते म्हणाले, शिक्षकांचे सर्व प्रश्न मी सोडवले आहेत. टप्पा अनुदान प्रश्न सोडवला आहे. जुनी पेन्शन योजनेची केस सुप्रीम कोर्टात राखीव आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कमिटी नेमली आहे. कमिटीच्या अहवालानंतर कोणत्याही प्रकारचे प्रश्न प्रलंबित राहणार नाही. गुरूजन वर्ग खुष असतील तर ते मुलांना चांगला न्याय देऊ शकतात. ही भुमिका घेऊन मी काम केलं. टप्पा अनुदानाचा प्रश्न सोडवला, शिक्षक भरती, केंद्रप्रमुख भरती मोठ्या प्रमाणात केली. कला क्रिडा, अपंग समायोजित शिक्षकांना न्याय दिला. ग्रंथपाल, लॅब असिस्टंट यांच अनुदान दहा पटीने वाढवलं. शिक्षक सेवकांचे मानधन वाढवलं असे मत श्री. केसरकर यांनी व्यक्त केले.
तसेच काम केल्यानंतर त्याची जाणीव ठेवली जाते हे पाहून आनंद झाला. टप्पा अनुदानातील ७० हजार शिक्षकांना टप्पा अनुदान देण्यात आले. अकराशे कोटींची रक्कम त्यासाठी लागली. त्या शिक्षकांचं प्रेम आज दिसून आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली जबाबदारी मी निभावली. कोकणी माणूस प्रेमाच प्रतिक आहे त्याप्रमाणे मंत्री म्हणून प्रेमाने जिंकण्याचा प्रयत्न केला.शिक्षकांना न्याय देण्याची भूमिका माझी होती असे प्रतिपादन दीपक केसरकर यांनी केले.
दरम्यान, उद्धव ठाकरेंना मी नेहमी आदर दिलेला आहे. महाविकास आघाडी शिवसेनेला संपवायला निघाली तेव्हा नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची बैठक मी घडवून आणली होती. याची जाण निदान उद्धव ठाकरेंनी ठेवायला हवी होती. राज्यात महायुतीचे सरकार तेव्हाच येणार होतं. मात्र, मुख्यमंत्री पदावरून पुन्हा घोळ झाला अन् सरकार येऊ शकलं नाही. त्यावेळी मंत्रीपदाची ऑफर दिलेली असताना मी ते नाकारले होते. कारण, सावंतवाडीच्या जनतेचा अपमान त्यांनी माझं मंत्रीपद काढून घेत केलेला. मी एक स्वाभिमानी नेता आहे त्यामुळे मंत्रीपद नाकारल होते. तर, उद्धव ठाकरेंना करारा जबाब द्यायला नारायण राणे पुरेसे आहेत. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनतेला न्याय देण्याच काम करत आहेत. अनेक योजना त्यांनी सुरू केल्यात. गोरगरिबांची काम करणारे आमचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार आहेत असंही ते म्हणाले.