
कोल्हापूर : प्रुडंट मीडिया व लाइव्ह मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापुरातील आघाडीच्या व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजकांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. कोल्हापुरातील सयाजी हॉटेलमध्ये बुधवारी झालेल्या या मेळाव्याला विविध उद्योग,संस्था, व्यापार आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत उद्योजक, डॉक्टर आणि दिग्गज उपस्थित होते.
यावेळी लक्ष्यराज शेट्ये, सागर लाडे, लुईस रॉड्रिग्स, केशव तळवडेकर आणि समीर सावंत यांच्यासह लाइव्ह मराठीचे प्रमोद मोरे यांच्यासह टीम प्रुडंट मीडियाने प्रुडंट मीडिया नेटवर्कचा कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्र प्रदेशात विस्तार आणि उपक्रमाविषयी माहिती दिली. या टीमने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यावर तयार केलेला माहितीपटही सादर केला, ज्याचे सर्वांनी मुक्तकंठाने कौतुक केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५० वी जयंती जुलैमध्ये गोव्यात साजरी करण्यात आली होती .
प्रुडंट मीडिया नेटवर्कच्या कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रात घेऊन जाण्याच्या उपक्रमाचे कोल्हापुरातील उच्चपदस्थांनी कौतुक केले आणि या पबाबतीत आपले सहकार्य व समर्थनही व्यक्त केले. डॉ. विजयकुमार माने, डॉ कौस्तुभ वायकर, मंगेश उत्तुरे, सुहास शालबिद्रे, जोसेफ बारदेस्कर, संग्राम मगदूम, सचिन पाटील, महेश पटवर्धन, गणेश शिर्के, पी एस जाधव, डॉ संदीप पाटील, अण्णासाहेब कुंभार, जी पी जाधव, शिवराज पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.