
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद पंचायत समित्यांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार असून जिल्हा परिषदांसाठी अध्यक्षपदांचे आरक्षण आज जाहीर झाली. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण प्रवर्ग निश्चित झाला आहे.
मार्च 2022 मध्ये जिल्हा परिषदांची मुदत संपल्यानंतर तेव्हापासून आतापर्यंत गेली सुमारे साडेतीन वर्ष सर्व जिल्हा परिषदेवर तसेच पंचायत समिती नगर परिषदा आधी स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकीय कारभार आहे. मात्र आता न्यायालयाने डिसेंबर २०२५ पर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू झाला असून जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठी आज आरक्षण काढण्यात आलेत. या आरक्षणामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी सर्वसाधारण म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी निश्चित झाले आहे.










