निर्णय घेण्यासाठी गेळे गाव सक्षम : सागर ढोकरे

Edited by: विनायक गावस
Published on: April 04, 2024 14:22 PM
views 272  views

सावंतवाडी : सध्या नागपूर गोवा शक्ती पीठ महामार्ग या विरोधगात गेळे गावाची बातमी पसरत आहे. गेळे गावचा कोणीही चुकीच्या पद्धतीने वापर करू नये.गेळे गावामध्ये कोणते प्रकल्प यावेत व कोणते येऊ नयेत याचा निर्णय घेण्यासाठी गेळे गाव व येथील सर्व ग्रामस्थ सक्षम आहेत. बाहेरच्या जिल्ह्यातील लोकांनी येऊन चुकीचे संदेश पसरवू नयेत. शासन स्तरावरुन गेळे गाव म्हणून गावाच्या बाजूने योग्य निर्णय होईल आणि तो गावच्या हिताचा असेल असं मत सरपंच सागर ढोकरे यांनी व्यक्त केले.