
कणकवली : कणकवलीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व दानशूर व्यक्तिमत्व सुधाकर उर्फ अपीशेठ गवाणकर यांचे नुकतेच निधन झाले. आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांचे सुपुत्र राजू गवाणकर व गौरव गवाणकर यांचे सांत्वन केले. यावेळी आमदार नितेश राणे यांच्यासोबत नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, वागदे सरपंच संदीप सावंत आदी उपस्थित होते.