गौरीशंकर खोत स्वयंघोषित प्रबोधनकार ; ए जी डॉटर्सबाबत पसरवतायत गैरसमज

उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचं प्रत्युत्तर
Edited by: उमेश बुचडे
Published on: October 14, 2022 13:00 PM
views 313  views

कणकवली : शिवसेना खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्यासोबत शिल्लक सेनेचे उपनेते, स्वतःला प्रबोधनकार समजणारे गौरीशंकर खोत हे ए जी डॉटर्स झिरो वेस्ट प्रकल्पाबाबत गैररसमज पसरवत आहेत. ए जी डॉटर्सला एक इंच जागा अद्याप कणकवली नगरपंचायतने दिलेली नसल्याचे उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

कणकवली शहरातील नगरपंचायत मार्फत ए जी डॉटर्स सोबत झालेल्या करारानुसार वार्षिक भाडे 3 लाख 54 हजार व डिपॉझिट 6 लाख 58 हजार ठरवून घेतले आहे. त्यानुसार त्यांना 3 एकर जागा भाड्याने देण्याचे ठरले आहे. मात्र त्यांनी अद्याप जागाभाडे नगरपंचायत ला न दिल्यामुळे 27 जुलै 2019 ला पहिले व 12 फेब्रुवारी 2020 रोजी दुसरे स्मरणपत्र डिपॉझिट व भाडे भरण्याबाबत दिलेले आहे. मात्र त्याला ए जी डॉटर्स ने त्याची पूर्तता केली नसल्यामुळे एक इंच जागाही ए जी डॉटर्स ला दिलेली नाही. बेस्ट मध्ये अनेक झोल करून आणि खंबाटा मध्ये घपला करणाऱ्या खासदारांना बाजूला बसवून उगीच मोठा आव आणू नये.

शिवसेनेचे उपनेते म्हणून खोत यांनी राज्यातील प्रश्नांवर बोलणे सोडून कणकवली सारख्या छोट्या नगरपंचायतवर टीका केल्यामुळे कणकवली नगरपंचायतची उंची वाढली आहे. आम्ही खोत यांच्यासोबत काम केलेले आहे. त्यामुळे यापुढे आमच्यावर टीका करण्याआधी विचार करा अन्यथा तुमचे सगळे कारनामे बाहेर काढू असा इशारा उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिला.