गौरवी बोडेकरची खेलो इंडिया एक्ससेलेन्स सेंटरला बॅडमिंटनमध्ये निवड

Edited by:
Published on: May 02, 2025 15:53 PM
views 245  views

सावंतवाडी : तालुक्यातील कुमारी गौरवी जानू बोडेकर (मदर क्वीन इंग्लिश स्कूल) हिचे खेलो इंडिया एक्ससेलेन्स सेंटर गोवा येथे बॅडमिंटन क्रिडा प्रकारात निवड झाली. एस सी स्पोर्ट्स अकॅडेमी सावंतवाडी अंतर्गत ती प्रशिक्षण घेत होती. याच अकॅडेमी च्या प्रशिक्षक सुमुख चव्हाण यांचा मार्गदर्शनाखाली मागच्या वर्षी कु. हर्ष शिवप्रसाद मुळीक याचे मागचा वर्षी निवड झाली. युवराज लखमराजे सावंतभोसले यांच्या कल्पनेतून साकारलेल्या प्रशिक्षण केंद्र मुळे हे शक्य झाले असे मत प्रशिक्षकांनी व्यक्त केले.